आपल्या बायकोच्या गुणांची परख करणे सगळ्यांनाच जमते असे नाही. बॉलिवूडकडून तर ही अपेक्षा नक्कीच नाही. पण, तरीही बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या नायकांनी आपापल्या बायकांसाठी त्यांचा आवडता व्यवसाय उघडून देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली आहे. अगदी शाहरूख खानने पत्नी गौरीला इंटेरिअरचे दुकान उघडून दिले आहे. ह्रतिकनेही सुझ्ॉनला गौरीबरोबर जोडून दिले आहे. अक्षय कुमारने ट्विंकलचे फॅशन डिझायनर होण्याचे स्वप्न पूर्ण करून दिले. मात्र, या सगळ्यांमध्ये वेगळा ठरला अजय देवगण. अजय आणि काजोलची जोडी बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. त्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे अभिनयाच्या बाबतीत काजोल अजयपेक्षा कायम वरचढ राहिली आहे आणि हे वेळोवेळी अजयनेच कबूल केले आहे. आपल्या या गुणी पत्नीसाठी अजय सध्या चांगल्या पटकथेवर काम करतो आहे. आपली चित्रपट कारकीर्द जशी महत्त्वाची तशी आपले घर आणि मुलेही तितकीच महत्त्वाची आहेत, या मतावर ठाम असणाऱ्या काजोलने विवाहानंतर आपले लक्ष घरसंसारावर केंद्रित केले होते. पण, हे करत असतानाही वेळात वेळ काढून निवडक चित्रपट, जाहिरातींमधून काजोलने आपले अस्तित्त्व कायम ठेवले आहे. काजोल आणि मी एकत्र काम करावे ही अनेकांची इच्छा आहे. पण, आम्हा दोघांच्या एकत्र येण्याला साजेलशी कथा असेल तरच ते जमू शकेल, असे म्हणणाऱ्या अजयने काजोलसाठीच चित्रपट करायचा असल्याचे आग्रहाने सांगितले आहे. सध्या तिच्यासाठी पटकथेवर काम करतो आहे. त्यामुळे आत्ताच काही सांगणे योग्य होणार नाही, असे त्याने सांगितले. पटकथा काजोलसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे त्या चित्रपटात मी तिच्याबरोबर असेनच असे नाही. जमलीच आमची जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने तर ठीक नाहीतर दुसऱ्या कुठल्यातरी चित्रपटात एक त्र काम करू. पण, हा चित्रपट काजोलसाठी आहे आणि त्याची निर्मितीही मीच करणार आहे, असेही पठ्ठय़ाने सांगून टाकले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा