राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात कुठेही न मिळालेले निर्विवाद बहुमत देणाऱ्या िपपरी पालिकेतील नगरसेवकांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी चिंचवडला येत असून त्यांच्या उपस्थितीत अॅटो क्लस्टर सभागृहात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणातून बऱ्यापैकी बाजूला पडलेल्या अजितदादांनी बालेकिल्ल्यातील डागडुजीसाठी आवर्जून वेळ काढला आहे.
िपपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून अजितदादा तेथे कारभारी आहेत. मागील काळात अजितदादांचा शहराशी संपर्क कमी झाला आहे. सध्या ते काही काळापुरते राज्याच्या राजकारणातून बाजूला पडले आहे. अशात, त्यांनी बालेकिल्ल्यातील नेते व नगरसेवकांच्या अडचणी दूर करण्यासाठी वेळ काढला आहे. गेल्या काही वर्षांपासून अजितदादांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक आयोजित करून त्यांच्या अडचणी सोडवल्याची राष्ट्रवादीची जुनी पध्दत आहे. तथापि, नव्या नगरसेवकांची तशी बैठक झाली नव्हती. स्थानिक नेते नगरसेवकांना अजितदादांपर्यंत पोहोचू देत नाही. त्यामुळे अनेक नगरसेवक त्यांची भेट घेण्यासाठी व स्वत:ची ओळख करून घेण्यासाठी आतूर आहेत. या पाश्र्वभूमीवर, अजितदादांच्या उपस्थितीत चिंचवडला बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी ते पक्षाचे नेते व नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय, महापालिकेच्या विविध प्रकल्प, योजना व निर्णयांचा आढावा घेणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा