ढगाळ वातावरण व पावसाच्या सरींमुळे विदर्भात काही जिल्ह्य़ात उकाडय़ापासून थोडा दिलासा मिळाला आहे, तर काही जिल्ह्य़ात गेल्या तीन दिवसांपासून उकाडा वाढला आहे. विदर्भात पुन्हा उन्हाचे चटके जाणवायला लागले. वध्र्यामध्ये दुपापर्यंत ४२.२ तर त्या खालोखाल अकोलामध्ये ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
पूर्वेकडून वाहणारे वारे व त्यांच्यासोबत आलेल्या बाष्पामुळे विदर्भात काही जिल्ह्य़ात गेल्या आठवडय़ात तुरळक पाऊस पडला. हवेतील बाष्पामुळे तापमानातही घट झाली, परिणामी बहुतांश ठिकाणी सरासरीच्या तुलनेत कमी तापमान नोंदवले गेले होते. मात्र, गेल्या दोन दिवसापासून पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवायला लागला आहे.
विदर्भात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. विदर्भात सर्वात जास्त तापमान वध्र्यामध्ये ४२.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. गेल्या आठवडय़ात नागपुरात ४२ अंश से. तापमान होते. ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी झाले असले तरी उकाडा वाढला होता. पुन्हा एकदा गुरुवारी उन्हाचा तडाखा जाणवायला लागला आहे. विदर्भातील विविध जिल्ह्य़ात सरासरीच्या तुलनेत जास्त तापमान नोंदवले गेले असून गेल्या चार पाच दिवसांपासून पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवायला लागला आहे. तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे उष्णतामानात विक्रमी वाढ होत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात आणि शहरातील काही भागात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक या भारनियमनामुळे त्रस्त झाले आहेत. प्रखर उन्हाळामुळे चाकरमानी लोक सोडले तर अनेक लोक सकाळी अकरानंतर घराबाहेर न पडता घरीच राहणे पसंत सायंकाळी ५.३० नंतर घराबाहेर पडतात. रणरणत्या उन्हामुळे शहरातील विविध भागातील रस्ते दुपारच्यावेळी सानसुन दिसतात. एकीकडे प्रखर उन्हाळा असताना अजूनही ग्रामीण आणि शहरातील काही भागात वीज जाण्याचे प्रकार सुरू आहे त्यामुळे अनेक लोकांना असह्य़ उकाडाचा त्रास सहन करावा लागतो. विदर्भात चंद्रपूर ३९.४ अंश से. ब्रह्मपुरी ४२.१ ,वर्धा ४२.२ नागपूर ४०.७ अकोला ४२, अमरावती ३९.६, बुलढाणा ३९.५, गोंदिया ३८.१ वाशीम ४०, यवतमाळ ४० अंश सें. तापमान नोंदवले गेले आहे.
वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्याबरोबरच निसर्गावरही परिणाम झाला आहे. रणरणत्या उन्हामुळे पक्ष्यांच्या संख्येत घट जाणवू लागली आहे. चिमण्या, कावळे हे शहरी भागात नित्य दिसणारे पक्षी दुपारच्यावेळी आता अभावानेच दिसतात. सकाळी दहापासूनच उन्हाचे चटके जाणवयला लागले. सायंकाळी गरम झळा जाणवत होत्या. वाढत्या वीज कपातीने उन्हाळ्याची तीव्रता आणखी जाणवते आहे. वीज गेली की उकाडा असह्य़ होतो. वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्याबरोबरच निसर्गावरही परिणाम झाला आहे. उन्हामुळे थंडपेयांचा व्यवसाय तेजीत आहे. उष्माघाताच्या रुग्णांमध्येही झपाटय़ाने वाढ होत चालली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा