सुमारे दीड वर्षांपासून अकोला महापालिकेत सत्तारूढ असलेल्या आघाडीकडून शहराचा विकास होत नव्हता. महापालिकेचे राजकारण विचित्र झाले होते. त्यातच महापालिका प्रशासनाचा कारभार आणखी रसातळाला गेला, अशा वातावरणात महापालिका आयुक्त दीपक चौधरी यांचा प्रशासनावरील वचक संपला होता. आयुक्त नीट काम करीत नाहीत, अशी सत्तारूढ गटाची तक्रारही होती. परिणामी आता चौधरी यांची बदली करण्यात आल्याचे अधिकृत सूूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी काल, गुरुवारी व परवा, शुक्रवारी भारिप व  काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांची बैठक झाली. त्यात विविध प्रष्टद्धr(२२४)्नाांवर चर्चा करण्यात आल्याचे महापालिकेतील भारिप बमसंचे गटनेता गजानन गवई यांनी सांगितले. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर, महापालिकेतील भारिपचे गटनेते गजानन गवई व समन्वयक धर्यवर्धन पुंडकर बैठकीला उपस्थित होते. यात महापालिकेच्या समस्यांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शहर विकासासाठी २६ कोटींच्या निधीचे नियोजन करणे, फोर जीचा सध्याचा प्रस्ताव रद्द करणे, हा प्रस्ताव देणा-या कंपनीने सुधारित दरासह प्रस्ताव सादर केल्यास तो महासभेपुढे मांडून महापालिकेकडून त्यास मंजुरी मिळविणे, महान धरणातून अकोलेकरांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करणे आदी प्रश्नांवर सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली.
आयुक्त चौधरी यांचा प्रशासनावर वचक नसल्याने व ते कोणताच निर्णय योग्य पद्धतीने घेत नसल्याने त्यांची बदली करण्याची मागणी गजानन गवई यांनी केली होती, त्याप्रमाणे या बठकीत निर्णय घेण्यात आला व आजच आयुक्तांच्या बदलीचा फॅक्स धडकला असल्याचे सांगण्यात आले आहे. गवई यांनी स्वत:च्या पत्रावर मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन काही मागण्या केल्या, त्यात महान धरणाची जल वाहिनी जीर्ण झाली असून, तिच्या दुरुस्तीसाठी व तेथे आणखी एक तिसरा पंप आणि इतर दुरुस्तीकरिता २० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
 महापालिकेच्या अधिका-यांनी विकास कामासाठी आलेल्या निधीपैकी २ कोटी रुपयातून कामाची देयके अदा केली आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व दोषी अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी देखील गवई यांनी केली आहे. महापालिका प्रशासनाला कंटाळून महापौरासह भारिप बमसंच्या सदस्यांनी धरणे दिले होते. कदाचित त्या धरणे आंदोलनाची ही फलश्रृती असल्याचे मानले जाते.

Story img Loader