वाघोली येथील माया हॉटेलमध्ये झालेल्या ‘दारूपार्टी’ प्रकरणी दाखल गुन्ह्य़ात हॉटेल मालक अंजली रजनीश निर्मल यांना न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. तपासात पोलिसांना सहकार्य करावे, खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत देश सोडून जाऊ नये, असा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाशीध एस.एम.शिंदे यांनी दिला.
वाघोली येथील माया हॉटेमध्ये एक सप्टेंबर रोजी छापा टाकून ग्रामीण पोलिसांनी ३०३ तरूण-तरुणींना अटक केली होती. त्याच बरोबर हॉटेल मालकासह, चालक, आयोजकांवर गुन्हा दाखल करून पाच जणांस अटक केली होती. याप्रकरणी हॉटेल मालक असलेल्या निर्मल यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. निर्मल यांच्या पत्त्याचा घोळ निर्माण झाल्यामुळे त्यांना पत्त्यासंदर्भात कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले.

Story img Loader