मुंबई-लातूर-नांदेड रेल्वे तत्काळ सुरू करावी, या मागणीसाठी उद्या (रविवारी) सर्वपक्षीय रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. देवगिरी एक्सप्रेस गाडी अडविण्यात येणार आहे. आंदोलनासाठी सकाळी सव्वासात वाजता रेल्वे स्थानकावर जमावे, असे आवाहन खासदार भास्करराव पाटील यांनी केले.
लातूरकरांनी आडमुठे धोरण स्वीकारल्याने मुंबई-लातूर रेल्वे नांदेडपर्यंत सोडण्यास रेल्वे विभाग दिरंगाई करीत आहे. अनेक वेळा निवेदन देऊनही रेल्वे बोर्डाने नांदेडकरांच्या मागणीचा सहानुभूतीने विचार न केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बठकीत घेण्यात आला. आंदोलनात बिलोली, देगलूर, नायगाव, नरसी, उमरी, धर्माबाद, मुगट, पाथरड, नांदेडसह रेल्वे प्रवासी मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत. स्वातंत्र्यसनिक, विद्यार्थी संघटनाही आंदोलनात उतरणार आहेत. परभणी, परळी, िहगोली, वसमत तालुक्यांतूनही आंदोलनात मोठा सहभाग नोंदविला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
देवगिरी एक्सप्रेस रेल्वे प्लॅटफार्म क्र. ४ वर येते. आंदोलकांनी गोकुळनगर रेल्वेगेटच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश न करता त्याच्या डाव्या बाजूने रेल्वे लाइनवर धडक मारावी. आंदोलनकर्त्यांसाठी रेल्वे रुळावर शामियाना टाकण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने ठोस आश्वासन न दिल्यास पोलिसांनी अटक करेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे. सर्वानी संयम पाळून शांततेच्या मार्गाने आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार ओमप्रकाश पोकर्णा, सुधाकरराव डोईफोडे, महापौर सत्तार, जि.प. अध्यक्ष दिलीप बेटमोगरेकर, उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक सरजितसिंघ गिल, स्वातंत्र्यसनिक संघटनेचे अध्यक्ष नारायणराव भोगावकर, डॉ. व्यंकटेश काब्दे, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, प्रकाश कौडगे, एमआयएमचे सय्यद मोईन, शेरअली खान, रिपाइंचे रमेश सोनाळे, विजय सोनवणे आदींनी केले आहे.
मुंबई-लातूर-नांदेड रेल्वेसाठी सर्वपक्षीय सरसावले
मुंबई-लातूर-नांदेड रेल्वे तत्काळ सुरू करावी, या मागणीसाठी उद्या (रविवारी) सर्वपक्षीय रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. देवगिरी एक्सप्रेस गाडी अडविण्यात येणार आहे. आंदोलनासाठी सकाळी सव्वासात वाजता रेल्वे स्थानकावर जमावे, असे आवाहन खासदार भास्करराव पाटील यांनी केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-08-2013 at 01:48 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All parties ahead for mumbai latur nanded railway