काँग्रेस, राष्ट्रवादी, पीरिपा, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, लोकमंच आणि रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) यांच्या संयुक्त आघाडीचे काँग्रेसचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ उत्तर नागपुरातील मार्टीननगर, जरीपटका रिंग रोड येथे जाहीर सभा झाली. या सभेत प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी खासदार गेव्ह आवारी, युवक काँग्रेसचे माजी महासचिव विशाल मुत्तेमवार, नगरसेवक वेदप्रकाश आर्य, राजा द्रोणकर, बंडोपंत टेंभुर्णे, फिलिप्स जैस्वाल, वर्षां श्यामकुळे, विनोद सोनकर उपस्थित होते. काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी दक्षिण नागपुरातील सक्करदरा, दिघोरी प्रभागात पदयात्रा केली. ताजबागपासून पदयात्रेला सुरुवात झाली. ढोल ताशांच्या निनादात ही पदयात्रा आयुर्वेदिक लेआऊट, भोसलेनगर, सुर्वे लेआऊट, दत्तात्रय नगर, सोनझारी नगर, भांडे प्लॉट, संतोषीमाता नगर, सरताज कॉलनी, गणेशनगर, महावीर नगर, ओमनगर, सुदामपुरी, जुनी शुक्रवारी, गांधी पुतळा, गजानन चौक, आनंद नगर, नेहरूनगर, कबीररनगर, गुरुदेव नगर, बापूनगर, रामकृष्णनगर, सेनापतीनगर या परिसरातून अनेक कार्यकर्त्यांसोबत निघालेल्या पदयात्रेची समारोप उमरेड रोड येथे झाला. पदयात्रेचे आयोजक ब्लॉक अध्यक्ष प्रवीण आगरे होते. उत्तर नागपुरातही मुत्तेमवार यांची पदयात्रा निघाली.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस चे नागपूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या प्रचारार्थ उत्तर नागपुरातील मार्टीनगरमध्ये झाली. या सभेत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. सुयोगनगर, राणी दुर्गावतीचौक, दर्शन कॉलनी, काशीबाईचे देऊळ, जुना दसरा रोड, टिमकी, आणि मोठा ताजबाग या स्ठिकाणी जाहीर सभा होऊन त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले.
नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ वाडी, दाभा परिसरात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आमदार सुधाकर देशमुख, संदीप जोशी, संजय बंगाले यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला नगरसेवक जगदीश ग्वालवंशी, नगरसेविका साधना बरडे, माजी महापौर माया इवनाते, परिणय फुके आदी प्रमुख कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी दाभा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच ब्लॉक काँग्रेसचे उपाध्यक्ष भीमराव शेंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. नितीन गडकरी यांना मोठय़ा संख्येने मतदान करून बहुमताने निवडून आणावे, असे आवाहन शेंडे यांनी याप्रसंगी केले.
डॉ. मोहन गायकवाड यांची प्रचार रॅली
नागपूर लोकसभा मतदारसंघाचे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डॉ. मोहन गायकवाड यांची पूर्व, दक्षिण व मध्य नागपुारत जाहीर सभा झाली. लाखो बेघरांना घरे, मुबलक व शुद्ध पिण्याचे पाणी, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे वचन डॉ. गायकवाड यांनी जाहीर सभेतून दिेले. नागपूरच्या दीक्षाभूमीला जागतिक स्तरावर पोहचवू असेही ते म्हणाले. बसपाला आपण संधी दिल्यास सर्व समाजाला न्याय मिळू शकतो, असा विश्वास डॉ. मोहन गायकवाड यांनी व्यक्त केला.
दक्षिण-पश्चिम नागपुरात डॉ. मोहन गायकवाड यांच्या प्रचारार्थ मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली त्रिशरण चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यापर्णण करून दक्षिण नागपुरातील जयभीमनगर, पार्वती नगर, रामेश्वरी, बॅनर्जी लेआऊट, रामटेके नगर, नरेंद्र नगर, मनीष नगर, चुनाभट्टी, अजनी, काशीनगर, भीमनगर, जोगीनगर, शताब्दीनगर, नरेंद्रनगर, काँग्रेसनगर, रहाटे कॉलनी, धंतोली, घाटरोड, इमामवाडा, रामबाग आदी परिसरात फिरून जाटतरोडी चौकात रॅलीचा समारोप झाला. रॅलीत माजी महापौर पांडुरंग हिवरकर, कृष्णा बेले, मिलिंद बन्सोड, किशोर गजभिये, राजेंद्र पडोळे, अजय डांगे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रचाराची रणधुमाळी
काँग्रेस, राष्ट्रवादी, पीरिपा, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, लोकमंच आणि रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) यांच्या संयुक्त आघाडीचे काँग्रेसचे नागपूर लोकसभा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-04-2014 at 03:09 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All political party busy in campaigning for lok sabha election in nagpur