पुणे स्फोटातील आरोपी असद खान याचा सहकारी असणाऱ्या अरिफ आमेल ऊर्फ काशिक बियाबानी याला पोलिसांनी २६ डिसेंबरला अटक केली. मात्र, अरिफ निष्पाप आहे. त्याची यापूर्वीही चौकशी झाली होती. पण त्याला सोडून देण्यात आले होते. तो जर्मन बेकरी व औरंगाबाद येथील शस्त्रसाठा प्रकरणात साक्षीदारही आहे. पुणे स्फोटात त्याला विनाकारण गोवण्यात आल्याचा आरोप त्याची आई आयेशा जफरोद्दीन बियाबानी यांनी केला.
निरपराध मुस्लिम मुलांना नाहक बळीचा बकरा बनविला जात असल्याचा आरोप करीत अरिफच्या आई-वडिलांसह मुस्लिम संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
पुणे स्फोटात आरोपी म्हणून अरिफ आमेल यास अशरफिया मशिदीतून ताब्यात घेण्यात आले. मात्र, माझ्या मुलाला विनाकारण त्रास दिला जात आहे, असा आरोप आयेशा बियाबानी यांनी केला. त्याच्याविषयी माध्यमांमधून येणाऱ्या वर्णनाबाबतही त्यांनी आक्षेप नोंदविले. माध्यमांनी न्यायाधीश बनू नये, असे फलकही निदर्शनांच्या वेळी लावले होते.
आयेशा बियाबानी यांना ४ मुले आहेत. त्यातील दोघे वकिली करतात, तर पकडलेला अरिफ विधीचे चौथ्या वर्षांचे शिक्षण घेत आहे. त्याने माझी शपथ घेतली होती. स्वत:च्या निष्पाप मुलांच्या डोक्यावर हात ठेवून तो स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगत होता. त्यामुळे पोलीस विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप अरिफच्या आईने सोमवारी केला. त्यांना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या संघटना व गणेश कॉलनी भागात राहणाऱ्यांनी निदर्शने केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा