महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना भिंगार कँप पोलिसांनी आज अटक केली. नंतर त्यांची न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. या तिघांनाही तपासासाठी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
जिल्हा संघटक सचिन डफळ, नितिन दत्तात्रेय भुतारे व महिला आघाडीच्या अनिता दिघे यांना अटक करुन नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. आठवडय़ापुर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मनसे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत धुमश्चक्री उडाली व दगडफेक झाली होती. दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. डफळ, भुतारे व दिघे हे तिघे आज सकाळी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले, पोलिसांनी त्यांना अटक करुन दुपारी न्यायालयापुढे हजर केले. चार दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या ७ व मनसेच्या ४ पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती, नंतर त्यांचीही जामिनावर सुटका करण्यात आली.

Story img Loader