पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या माहीम येथील ‘अल्ताफ मंजिल’च्या माजी मालकाच्या तीन मुलांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
इरफान, शरीफ आणि मोहम्मद फर्निचरवाला अशी या तिघांची नावे असून त्यांनी अटक होण्याच्या भीतीने सोमवारी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांच्या अर्जावरील सुनावणी बुधवापर्यंत तहकूब करीत तोपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. १५ जून रोजी याप्रकरणी अॅड्. रिझवान र्मचट यांनी गुन्हा दाखल केला होता. र्मचट यांची आई, पत्नी आणि मुलगा यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत इमारतीची एक बाजू पूर्णपणे कोसळून त्यात १० हून अधिकजण मृत्युमुखी पडले होते. इमारतीच्या बांधकामात बेकायदा बदल केल्यामुळे इमारत कोसळल्याचा आरोप करीत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘अल्ताफ’ दुर्घटना : माजी मालकांची अटकपूर्व जामिनासाठी धाव
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या माहीम येथील ‘अल्ताफ मंजिल’च्या माजी मालकाच्या तीन मुलांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. इरफान, शरीफ आणि मोहम्मद फर्निचरवाला अशी या तिघांची नावे असून
First published on: 20-06-2013 at 08:06 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Altaf accident formar owner searching for non arrest bail