२० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारणाचा आदर्श जपण्याची तसेच सर्वसामान्य मराठी माणूस पुढे येण्यासाटी पक्षाच्या माध्यमातून यापुढेही सतत कार्यरत राहण्याची ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आ. वसंत गीते यांनी दिली.
मनसेच्या करिअर विभागातर्फे येथील जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीत आयोजित पोलीस भरतीपूर्व विनामूल्य मार्गदर्शन शिबीराच्या समारोपात ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शक प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. या शिबीरातंर्गत १८ मेपासून केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे क्रीडा अधिकारी हेमंत पाटील, कैलास लवांड, शरद पाटील, प्रा. सारिका जगताप आदींच्या मार्गदर्शनाखाली परीक्षार्थींकडून शारीरिक सराव करून घेण्यात आला. त्यात लांब उडी, गोळा फेक, धावणे आदी प्रकारांचा समावेश होता. डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने शिबीरार्थीची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. लेखी परीक्षेचा सराव प्रा. राम खैरनार, डॉ. जी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. शिबीरात भारतीय राज्यघटना व इतिहास, नागरिक शास्त्र, सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान, बुध्दिमत्ता चाचणी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
समारोप कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिबीरार्थी विद्यार्थ्यांना शारीरिक प्रशिक्षणासंबंधीची चित्रफीत दाखविण्यात आली. काही शिबीरार्थीनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी चंद्रकांत खोडे, मनसे करिअर विभागाचे अध्यक्ष सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा