पुणे येथील अखिल भारतीय संगीत संघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील संगीत स्पर्धेत अंबरनाथ येथील गुरुकृपा संगीतालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. आठ हजार ५०० विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होते. रोहन मोरे, ओंकार पाध्ये, गायत्री पाध्ये आणि सिद्धी बोरकर आदिताल ग्रुपने समूह तबलावादनात प्रथम क्रमांक, सोलो तबलावादनात रोहन मोरेने द्वितीय, तर ओंकार पाध्ये आणि गायत्री पाध्ये यांनी चौथा क्रमांक मिळविला. सर्व विद्यार्थी सुनील शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिकत आहेत. उल्हासनगर येथील शुभांगी जेरे संचालित स्वरांजली संगीत विद्यालयाच्या रिद्धी बोरकर या विद्यार्थिनीने शास्त्रीय गायनात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

Story img Loader