स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कारासाठी सहकारातील ज्येष्ठ नेते आमदार सा. रे. पाटील यांची निवड झाली. याशिवाय डॉ. अण्णासाहेब िशदे स्मृती पुरस्काराने एमकेसीएलचे संचालक विवेक सावंत यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती जयिहद लोकचळवळीचे संस्थापक आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.
रोख ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब िशदे यांच्या स्मृतीदिनी १२ जानेवारी रोजी पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. तसेच यानिमित्त १२ ते १४ दरम्यान संगमनेरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन मंत्र्यांसह विधानपरिषदेचे उपसभापती यावेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याच्या पुराभिलेख विभागाच्या वतीने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार  यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आणि भाऊसाहेब थोरात यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील यशोधन बिल्डिंगच्या प्रांगणात दुपारी १२ वाजता जयंतीमहोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी असतील. एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ अ‍ॅड. रावसाहेब िशदे, कृषितज्ञ विजयअण्णा बोऱ्हाडे, अमेय प्रकाशनचे संचालक उल्हास लाटकर उपस्थित राहणार आहे. सायंकाळी संगीतकार श्रीधर फडके यांचा ‘गीत रामायण’ हा कार्यक्रम होणार आहे.
रविवारी (दि. १३) यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमीत्त ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे व्याख्यान होईल. विधानपरिषदेचे उपसभापती वसंत पुरके या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. सायंकाळी गायक अवधूत गुप्ते आणि ‘राधा ही बावरी’ फेम स्वप्निल बांदोडकर यांचा ‘संगीत रजनी’ हा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (ता. १४) वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने राज्याचे मंत्री मनोहर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सुधीर गव्हाणे आणि वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य राजाराम राठोड यांची व्याख्याने होणार आहेत. सायंकाळी लोकशाहीर विठ्ठल उमप प्रतिष्ठानचा ‘मी मराठी’ हा लोकसंगीताचा कार्यक्रम होईल. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, दूध संघाचे अध्यक्ष रामनाथ राहाणे, कारखान्याचे संचालक प्रताप ओहोळ, उपसभापती बाळासाहेब गायकवाड, बाबा खरात आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा