साधारण ६ वर्षांपासून सुरू असलेली मृत्यूबरोबरची त्याची झूंज आज सकाळी थांबली. त्याच्या निधनाने अभिनेता आमिर खानही गहिवरला. उपचारासाठी त्याला जगातील कोणत्याही रुग्णालयात नेण्याची आमिरची तयारी होती. बंदे मे था दम अशा शब्दांत त्याने श्रद्धांजली अर्पण केली.
स्नेहालय मध्ये वाढत असलेल्या समीरला मृत्यूपश्चात अशी मानवंदना मिळाली. कारण त्याची कथाच तशी होती. जन्मापासून तो एडसबाधीत होता. कोणीतरी त्याला रेल्वेस्थानरावर बेवारस सोडून दिले होते. स्नेहालय या उपेक्षितांसाठी काम करणाऱ्या संस्थेतंर्गत असलेल्या चाईल्ड लाईन ला कोणीतरी त्याची माहिती दिली. त्यांनी त्याला संस्थेत आणले. समीर असे त्याचे नामकरण केले. तेव्हापासून गेली ६ वर्षे तो संस्थेतच होता. आजाराशी झुंजत होता.
वैद्यकीय तपासणीत त्याला एडसबरोबरच एसएसपीई हा दुर्धर आजारही असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर तो मुकबधीरही होता. स्नेहालयने त्याच्यावर उपचार सुरू केले. त्याचा खर्च पुण्यातील अभियंता असलेल्या सुनिता जोशी करत होत्या. स्नेहालय मधील चंद्रकांत शेंबडे, अजय सालोटे, गीता सिंग, मंगला नाईक, रेणुका दहातोंडे हे त्याची शुश्रुषा करत होते. २६ जानेवारीला आमिर खान याने संस्थेला भेट दिली व समीरची कहाणी ऐकून तोही हेलावला. त्याच्या उपचाराची माहिती घ्या, आपण त्याला कुठेही नेऊ असे त्याने स्नेहालयला सांगितले.
आज सकाळी त्याचे निधन झाले. स्नेहालयने ही माहिती आमिरला कळवली. संस्थेला शोकसंदेश पाठवून त्याने शोक व्यक्त केला. बंदे मे था दम म्हणून त्याने श्रद्धांजली अर्पण केली व स्नेहालय सारख्या संस्थेमुळे समीरचे लहानगे आयुष्य तरी समृद्ध झाले म्हणून समाधान व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा