जुनी कायम ठेवत शहर जिल्हा काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काल मान्यता दिली. विस्तारित कार्यकारिणीत १७ जणांचा नव्याने समावेश झाला आहे. त्यामध्ये सरचिटणीसपदी अनंत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या विस्तारामुळे त्यातील पदाधिकाऱ्यांची संख्या आता ५२ झाली आहे. नगरसेवक धनंजय जाधव यांच्यासह तिघे विशेष निमंत्रित आहेत.
प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील यांच्या सुचनेनुसार शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी ही नवी व जुनी यादी आज जाहीर केली. विस्तारित कार्यकारिणीची यादी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मान्यता घेऊन सारडा यांनी गेल्या आठवडय़ात मंजुरीसाठी प्रदेशकडे पाठवली होती. महापालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होतील, या पाश्र्वभूमीवर सध्याची कार्यकारिणी बदलल्यास पक्षात नाराजी वाढेल, या उद्देशाने मंत्री थोरात यांनी जुनी कायम ठेवत, नव्यांना संधी देण्यासाठी कार्यकारिणीचा विस्तार करण्याची सूचना सारडा यांना धाडली होती.
नवे चेहरे पुढीलप्रमाणे:-अनंत देसाई (सरचिटणीस), दिप चव्हाण, बाळासाहेब पवार व संजय लोंढे (उपाध्यक्ष). डॉ. अविनाश मोरे, डॉ. ज्योती तनपुरे, संध्या मेढे, निजाम जहागीरदार व सय्यद खलीद (चिटणीस). अभिजित कांबळे (सहचिटणीस). डी. जी. भांबळ, आदित्य पानसंबळ, गणेश विद्ये व रजनी सारसर (सदस्य). धनंजय जाधव, निलिनी गायकवाड व अशोक त्रिभुवन (विशेष निमंत्रित). आता कार्यकारिणीत १ अध्यक्ष, ६ उपाध्यक्ष, १ खजिनदार, ६ सरचिटणीस, ५ चिटणीस, १ सहचिटणीस, २९ सदस्य व ३ विशेष निमंत्रित सदस्य असे एकूण ५२ जण आहेत.
जुन्या कार्यकारिणीतील ३५ जण हे पक्षातून निलंबित केलेला शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकरच्या काळात नियुक्त केलेले आहेत. त्यामुळे कोतकर जरी पक्षाबाहेर व सध्या तुरुंगात असला तरी समर्थकांची लॉबी पक्षात कार्यरत राहणार आहे.

Story img Loader