शहरातील अनंत देशमुखने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) गुणवत्ता यादीत ५८ वा क्रमांक मिळविल्याने काँग्रेस शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
अनंतने सेंट झेवियर्स शाळेत आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर औरंगाबाद येथे सव्र्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिटय़ूटमध्ये एनडीएची पूर्वतयारी केली. या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्रातून केवळ ५० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत हे सर्व टप्पे पार केल्यानंतर त्याची एनडीएसाठी निवड झाली. त्याच्या पुढील कारकीर्दीसाठी बोरस्ते यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नाशिकरोडचे सतीश मंडलेचा, प्रकाश नाईक, प्रसाद जामखिंडीकर, अजीत बने आदी उपस्थित होते.
एनडीए गुणवत्ता यादीत अनंत देशमुख
शहरातील अनंत देशमुखने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) गुणवत्ता यादीत ५८ वा क्रमांक मिळविल्याने काँग्रेस शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
First published on: 14-06-2014 at 07:32 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant deshmukh in nda rankers list