संगणकावर किंवा मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून घरोघरी हवी ती माहिती मिळत असली तरी कुठला सण केव्हा आहे.. त्या दिवशी तिथी कोणती आहे.. थोर पुरुषांची आणि संत महात्म्याची पुण्यतिथी, जयंती.. यासह प्रत्येकमहिन्यातील राशीभविष्य व दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टीची माहिती मिळविण्यासाठी आज घरोघरी कॅलडेरशिवाय पर्याय नाही. नवीन वर्षांला प्रारंभ होताच घरोघरी, सरकारी, निमसरकारी कार्यालयातील भिंतीवर कॅलेंडर लावली जातात.
नवीन वर्ष सरायला सहा दिवस शिल्लक असले तरी गेल्या एक महिन्यापासून बाजारात आगळेवेगळे स्वरूप देऊन विविध प्रकाशकांची कॅलेंडर्स बाजारात विक्रीसाठी आली आहेत. नववर्षांचे भविष्य, पंचांग जाणण्याची सर्वसामान्याला उस्तुकता असते. त्यामुळे कॅलेंडर घरात असणे काळाची गरज बनले आहे. कॅलेंडरचा इतिहास जुना असला तरी काळाच्या प्रवाहाबरोबर कॅलेंडरने आपले स्वरूप बदलले आहे. काही वर्षांपूर्वी मिळणाऱ्या कॅलेंडरवर धार्मिक देवदेवता, क्रीडापटू, निसर्ग आदींच्या छायाचित्रांना पसंती होती. तारीख पाहण्यासाठी बारा महिन्यांचे बारा कॉलम होते. त्यामुळे भविष्य, पंचांग व इतर महत्त्वपूर्ण माहिती मिळत नसे. गेल्या १० वर्षांत छायाचित्रे असलेली कॅलेंडर्स कालबाह्य़ झाली असून सहा ते १२ पानी भरगच्च माहिती असलेली कॅलेंडर ग्राहक ३० ते १०० रुपये देऊन खरेदी करू लागला आहे. कालनिर्णय, निर्णयसागर, महालक्ष्मी, हिंदू चेतना, सनातन सभा, यासह विविध संस्थांची कॅलेंडर्स विविध प्रकाशकांनी बाजारात आणली आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांची गरजपूर्ती ओळखून ही कॅलेंडर तयार करण्यात आली आहेत. कालनिर्णयाचा बोलबाला असताना आज विविध हिंदू संघटनांनी कॅलेंडर्स प्रकाशित केली असून त्यात विविध संतांची, देवदंवतांची आणि थोर पुरुषांची चित्रे आहेत. या शिवाय पंचांग, लग्न, मौंज मुहुर्त, लहान मुलांनी स्वच्छतेबाबत घ्यायवयाची काळजी, आरोग्य विषयक आणि वेगवेगळी खाद्य पदार्थ तयार करण्यासंदर्भातील माहिती, महापुरुषांची छायाचित्रे आदी विषयांवरील माहिती कॅलेंडरमध्ये आहे. काही खासगी प्रकाशकांनी एका विशिष्ट विषयावर कलेंडर्स तयार केली आहेत. या शिवाय चित्रपट अभिनेते, पर्यटन स्थळे, लहान मुलांचे छायाचित्र असलेली कॅलेडर बाजारात विक्रीसाठी आली आहे. विविध कंपन्याचे टेबल कॅलेंडरही मोठय़ा प्रमाणात बाजारात विक्रीला आले.
गेल्या काही वर्षांत विविध दैनिके आणि साप्ताहिके आता कॅलेंडर्सची निर्मिती करून वाचकांना देण्याचा प्रयत्न करू लागली आहेत. वर्षांच्या शेवटी अंकासोबत कॅलेंडर दिले जात असून त्यात नागरिकांना हवी असलेली माहिती, रेल्वे, एसटीचे वेळापत्रक, शहरातील महत्त्वाचे संस्थाचे दूरध्वनी व संबंधित विभागाची माहिती दिली जाते. भविष्य, पंचांग, रेल्वे-बस टाईमटेबल, तेजी-मंदी, विविध सण-उत्सव, नामवंत लेखकांचे लेख, किचनचा मेनू, योगासने विवाह मुहूर्त हे सर्व एका कॅलेंडरमध्ये असल्याने ग्राहक ही कॅलेंडर खरेदी करू लागला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या कॅलेंडरमध्ये एक ते दोन रुपयांची वाढ होत होते. गेल्या काही वर्षांत काही संघटनेच्या कॅलेंडरचा खपही वाढू लागल्याने कॅलेंडरमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रत्येकजण वेगळे काही तरी देण्याचा प्रयत्न करीत आहे. वेळ पाहण्यासाठी घडय़ाळाचा वापर होतो त्याप्रमाणे घरा-घरात कॅलेंडरचा वापर होऊ लागला आहे. या व्यवसायात दरवर्षी कोटय़वधींची आर्थिक उलाढाल होत असल्याचे कॅलेंडर विक्रेत्यांनी सांगितले.

Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या राशीसाठी ठरेल लाभदायक? बाप्पा करणार का तुमच्या इच्छा पूर्ण; वाचा सोमवारचे राशिभविष्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन