जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांशी संबंधित विविध योजनांकडे समाजकल्याण विभागाने घेतलेल्या निद्रावस्थेच्या सोंगामुळे विद्यार्थी समस्यांवर मोठया प्रमाणावर दुर्लक्ष हेात आहे. या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी झोपलेल्या प्रशासनाला जागविण्याकरिता या विभागात क ोंबडा ठेवून कुकुचकू आंदोलन करण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की, समाजकल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजना जसे विद्यार्थी स्कॉलरशिप व विद्यार्थी वसतीगृह व संबंधित विभागाच्या विविध योजनांकडे जातीने लक्ष न घातल्याने विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. याच बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी मनविसेने कुकुचकू आंदोलन केले. यावेळी मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवानेते मनोज पवार, उपजिल्हाध्यक्ष मंगेश मुंगळे, जिल्हा संघटक संजय हाडे, भय्यासाहेब मारोडकर, शहराध्यक्ष राज तिवारी यांच्या उपस्थितीत बबलू शेख, प्रदीप भवर, राहुल जाधव, निखिल चाफेकर, राहुल सरोदे, भय्या शिंदे, बाबा खान, पंकज रिंढे, खरात, मेहर अली, पप्पू चौधरी, संजय मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा