जालना जिल्हा तलाठी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष टी. आर. ताम्हणे यांच्यासह पदाधिकारी-सदस्य या आंदोलनात सहभागी झाले. तलाठी सज्जाची पुनर्रचना करावी, मंडल अधिकाऱ्यांना कृषी पर्यवेक्षकाप्रमाणे पगार मिळावा, कार्यालयीन भत्त्यात वाढ करावी, लॅपटॉप पुरवठा करावा, सीआरपीच्या १५६(३) कलमात सुधारणा करावी, नायब तहसीलदारांना तहसीलदारपदावर पदोन्नती देण्याच्या कोटय़ात बदल करावा, मासिक पगारात प्रवासभत्ता मंजूर करणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले.

Story img Loader