ऊस दरावरून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांना अटक झाल्यानंतर त्याचे पडसाद पिंपरीतही उमटले. शेट्टी यांना अटक करणे हा सरकारच्या षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप करत गोळीबार व दोन जणांच्या मृत्यूच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजप, इंडिया अगेन्स्ट करप्शन, नागरी हक्क सुरक्षा समिती, श्रमिक एकता महासंघ, विश्वकल्याण कामगार संघटना आदींनी संयुक्तपणे निदर्शने केली. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार, सरचिटणीस नामदेव ढाके, माजी नगरसेवक मारूती भापकर, मानव कांबळे, प्रदीप पवार, दिलीप पवार आदी उपस्थित होते. काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करत जवळपास तीन तास निदर्शने करण्यात आली. त्यानंतर सभा घेऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा