आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करीत असलेल्या अंगणवाडी सेविकांनी येथे भीक मांगो आंदोलन करून १२६३ रुपये जमा केले व ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवले.  अंगणवाडी सेविकांनी ६ जानेवारीपासून आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही म्हणून ९ जानेवारीपासून त्यांनी बेमुदत आंदोलन चालवले आहे. येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो अंगणवाडी सेविकांनी अचानक भिक मांगो आंदोलन करून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकडून १२६३ रुपये जमा केले व ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवले. अंगणवाडी सेविकांसाठी सेवाशर्ती तयार करण्यासाठी ३२ खासदारांच्या समूह गटाने चंद्रेशकुमारी यांच्या नेतृत्वाखाली १० ऑगस्ट २०११ ला संसदेला अहवाल सादर केला होता, पण तो धुळखात असल्याचा अंगणवाडी सेविकांचा आरोप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा