लोकसभा निवडणुकीत अनिल देशमुखांना उतरविण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसने दिले असून त्यांच्यासाठी मतदारसंघाचा शोध सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी दिली असून यात अनिल देशमुखांचाही समावेश आहे. त्यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून लढविले जाण्याची शक्यता आहे. या निर्णयाची कुणकुण लागल्याने राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांमध्ये तसेच ज्येष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
केंद्रात सत्तेचा वाटा मिळविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य राष्ट्रवादीने निर्धारित केले असून निवडणूक रणनितीचाच एक भाग म्हणून छगन भुजबळ, गणेश नाईक, सुनील तटकरे, जयंत पाटील, जयदत्त क्षीरसागर, बबनराव पाचपुते, वसंत डावखरे, रामराजे निंबाळकर आणि अनिल देशमुख यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे स्पष्ट आदेशच देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकून स्वत:ला पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ठेवण्याचे शरद पवारांचे स्वप्न असले तरी स्वबळावर सत्तेत येणे शक्य नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी, संयुक्त पुरोगामी आघाडी किंवा तिसऱ्या आघाडीच्या पाठिंब्याने त्यांचे स्वप्न साकारू शकते. त्रिशंकू स्थिती उद्भवल्यास राष्ट्रवादीचे खासदार निर्णायक भूमिका बजावू शकतात. त्यामुळे निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या मंत्र्यांना थेट लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा