कल्याण-डोंबिवली पालिकेतील ‘ब’ प्रभाग क्षेत्र अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अनिल लाड या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे. लाड हे ‘क’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अनिल लाड हे कोणतेच प्रभाग अधिकारी पद स्वीकारण्यास तयार नव्हते.
‘ब’ प्रभागाचा प्रभारी प्रभाग अधिकारी व उपअभियंता दत्तात्रय मस्तुद याला लाचलुचपत खात्याने लाच घेताना पकडल्याने त्याला पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले. त्याच्या जागी सामान्य प्रशासन विभागातील विनय कुळकर्णी या लेखाधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू होत्या. या पदावरील अधिकारी कोणत्याही क्षणी निलंबित होऊ शकतो असे पालिकेतील वातावरण आहे. त्यामुळे या पदी जाण्यास लाड, कुळकर्णी हे काही महिने टाळाटाळ करीत होते.
निलंबित मस्तुदच्या जागी प्रभाग अधिकाऱ्याची निवड
कल्याण-डोंबिवली पालिकेतील ‘ब' प्रभाग क्षेत्र अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अनिल लाड या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे. लाड हे ‘क' प्रभागाचे प्रभाग अधिकारी आहेत
First published on: 30-04-2014 at 08:42 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil lad gets the responsibility of kdmt b ward area