कल्याण-डोंबिवली पालिकेतील ‘ब’ प्रभाग क्षेत्र अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अनिल लाड या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे. लाड हे ‘क’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अनिल लाड हे कोणतेच प्रभाग अधिकारी पद स्वीकारण्यास तयार नव्हते.
‘ब’ प्रभागाचा प्रभारी प्रभाग अधिकारी व उपअभियंता दत्तात्रय मस्तुद याला लाचलुचपत खात्याने लाच घेताना पकडल्याने त्याला पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले. त्याच्या जागी सामान्य प्रशासन विभागातील विनय कुळकर्णी या लेखाधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू होत्या.  या पदावरील अधिकारी कोणत्याही क्षणी निलंबित होऊ शकतो असे पालिकेतील वातावरण आहे. त्यामुळे या पदी जाण्यास लाड, कुळकर्णी हे काही महिने टाळाटाळ करीत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा