आ. सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी गटाशी सहयोग असलेल्या शहर विकास आघाडीचे अनिल वाणी हे येथील पालिकेच्या उपमहापौरपदी निवडून आले आहेत. त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. राष्ट्रवादीचे सदस्य निवडणुकीत तटस्थ राहिले.
राखी सोनवणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली. विजयी झालेले वाणी यांना मात्र उपमहापौर म्हणून आपले कर्तृत्व दाखविण्यासाठी केवळ सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. शहर विकास आघाडी अर्थात सत्ताधारी गटातर्फे वाणी आणि भाजपचे विजय गेही यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीत वाणी यांना ३५ तर गेही यांना ११ मते मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांनी मात्र यावेळी तटस्थ भूमिका घेतली. पालिकेत आ. जैन गटाचे ३२ तर त्यांच्या सहकारी शहर विकास आघाडी या कैलास सोनवणे यांच्या नेतृत्वातील गटाच्या आठ सदस्यांची सत्ता आहे. त्यात जैन गटाचा महापौर तर सोनवणे गटाचा उपमहापौर असे समीकरण आहे. महापालिका निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली असताना उपमहापौर राखी सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा