अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने २७ ते ३० नोव्हेंबपर्यंत राज्यस्तरीय अंकुर चित्रपट महोत्सवाचे आयोजन नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारकात करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण सामाजिक आशयाला धरून असलेले ५० लघुपट या महोत्सवात प्रदर्शित केले जातील.
हा महोत्सव नवोदित कलाकारांच्या सृजनशिलतेला मानाचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम आहे. चित्रपटासारख्या लोकप्रिय माध्यमांकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने न पाहता या माध्यमाच्या परिणामांचे गांभीर्य लक्षात घेऊन समाजातील दुर्लक्षित प्रश्नांकडे सर्वसामान्यांचे लक्ष वेधण्यासाठी देखील या माध्यमाचा वापर केला जाऊ शकतो ही जाणीव अंकुरद्वारे निर्माण केली जात आहे. या राज्यस्तरीय चित्रपट महोत्सवामुळे माध्यमकर्मीनी स्वत: बनविलेले, सामाजिक आशयाला अनुसरून असलेले समुदाय व्हिडिओ, माहितीपट आणि लघुपट प्रदर्शित करण्याकरिता उत्तम संधी नवोदित निर्मात्यांना उपलब्ध होणार आहे. इच्छुक निर्मात्यांनी १५ नोव्हेंबर २०१४ पर्यंत आपल्या फिल्म्स पाठवाव्यात असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा