ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चौथ्या राष्ट्रीय दौ-याची सुरुवात परवापासून (शुक्रवार) होणार आहे. पहिल्या टप्प्यात मध्य प्रदेश तर दुस-या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये सभा घेऊन हजारे जनजागृती करणार आहेत.
हजारे यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचा नियोजित दौरा लांबणीवर पडला होता. राळेगणसिध्दी येथे विश्रांती घेऊन तंदुरुस्त झाल्यानंतर हजारे पुन्हा दौ-यासाठी सज्ज झाले आहेत. जनलोकपाल विधेयक, नकाराधिकार, भारतीय राज्यघटनेविरोधी राजकीय पक्ष याविषयी हजारे जनजागृती करणार आहेत. या दौ-यासाठी हजारे आज राळेगणसिद्घीहून पुण्याकडे रवाना झाले असून पुण्याहून ते सायंकाळी सहा वाजता मध्य प्रदेशातील रेवा येथे जातील असे दत्ता आवारी यांनी सांगितले.
या दौ-याच्या प्रारंभी मध्य प्रदेशातील रेवा येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर रामपूर, चुहाट, जबलपूर, ढिंदवाडा, दैबूल, इटारसी, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जन, देवास, इंदोर या मोठय़ा शहरांसह परिसरातील मोठी गावे व जिल्ह्याच्या ठिकाणी हजारे चौकसभांद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत.
दि. १७ जुलैपर्यंत हजारे मध्यप्रदेशात थांबतील. त्यानंतर दि. २३ जुलैपासून ते उत्तर प्रदेशातून पाचव्या दौ-यास सुरुवात करणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा