दिल्लीतील सामुहीक बलात्कार प्रकरणातील मृत्यू पावलेल्या पिडीत युवतीस देश कधीही विसरणार नसल्याचे सांगुन महिलांवरील बलात्कार व अत्याचारांच्या विरोधात कठोर कायदे न झाल्यास सरकारशी पुन्हा संघर्ष करावा लागेल असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
या युवतीस वाचविण्याचे बरेच प्रयत्न झाले मात्र त्यास यश आले नाही असे सांगून अण्णा पुढे म्हणाले या प्रकरणातून सरकारने आता बोध घेण्याची गरज असून अशी कृत्ये करणारांना फाशी अथवा जन्मठेपेच्या शिक्षेची कायद्यात तरतूद असती तर असे कृत्य करण्याचे कोणी धाडसच केले नसते. यापुढील काळात महिलांवरील अत्याचाराविरोधात कठोर कायदे व्हावेत अशी आग्रही मागणी करून सरकार त्यास धजावले नाही तर सरकारविरोधात पुन्हा संघर्ष करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला़ या कायद्याचा मसुदा तयार करताना त्या समितीमध्ये ज्येष्ठ वकील, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रतिनिधींचाही समावेश असावा अशी सुचनाही त्यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा