गडचांदूरच्या राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालयात पार पडले.
या निमित्ताने दिवसभरात उद्घाटनानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
‘ग्रंथालय चळवळ गतिमान करण्यासाठी समाजाचा सहभाग’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यात डॉ. रमेश जनबंधू व उपप्राचार्य सुभाष पाथ्रीकर यांनी विचार व्यक्त केले, तर आजच्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या अडचणी व शासनाकडून शंका-समाधान या विषयावर प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक एस.डब्ल्यू. बनसोड यांनी विचार व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष विठ्ठलराव थिपे होते. या परिसंवादात कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे होते, तर प्रमुख उपस्थिती जिल्हा ग्रंथपाल आर.जी. कोरे, प्रमुख कार्यवाह अनिल बोरगमवार, उमाकांत धांडे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
या कार्यक्रमात उत्कृष्ट संचालन केल्याबद्दल प्रा. विजय आकनुरवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल बोरगमवार यांनी मांडलेल्या ठरावांना मंजुरी देण्यात आली. पसायदान आरजू आगलावे व प्रतिभा पात्रीकर यांनी गायले.
हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालयाचे सचिव प्रशांत उपलेंचवार, मनोहर बुऱ्हाण, आरजू आगलावे, धनंजय गोरे, प्रा. प्रफुल्ल माहुरे, अशोक डोईफोडे, गिरीधर बोबडे, शरद जोगी, माधुरी पेटकर, कृष्णा बत्तुलवार, हनुमान मस्की, विलास बोढे, सतीश ठाकरे, प्रा. कोल्हे, रवी काकडे,
वामन कोंडेकर, एस. वासाडे, रमेश पाटील, आशीष देरकर, मारोती गुडेकर, विनाद कोगेकर यांनी सहकार्य केले.
ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन
गडचांदूरच्या राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालयात पार पडले.
First published on: 05-12-2012 at 01:27 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annual meet of granthalaya