शतक महोत्सवाकडे वाटचाल करणा-या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या वार्षकि सर्वसाधारण सभेत बँकेची सद्यआíथक स्थिती, अल्पमुदत कर्ज, मध्यम मुदतकर्ज, संचालकांशी संबंधित साखर कारखाने व शिक्षण संस्थांकडे असलेली कर्ज थकबाकी आदी आक्षेपार्ह मुद्दय़ांवर गोंधळ झाला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल देत सत्ताधारी संचालकांच्या समर्थकांनी प्रश्न विचारणा-या सभासदांची मुस्कटदाबी केली. या गोंधळातच ही सभा अवघ्या काही मिनिटांत गुंडाळण्यात आली. दोनतीन वर्षांपर्यंत आíथक स्थिती भक्कम असलेल्या या जिल्हा बँकेला लेखा परीक्षकांनी ‘क’ दर्जा दिल्याचे या सभेत स्पष्ट झाले.
बँकेची ९४ वी वार्षकि सर्वसाधारण सभा बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात बँकेचे अध्यक्ष, आमदार दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. विषय पत्रिकेवरील सर्व विषय आठ मिनिटांत मंजूर झाले. परंतु या वेळी बँकेच्या इतिहासात प्रथमच गोंधळ उडाला. शेतकरी सभासदांची कर्ज वाटपाविषयची आक्रमकता वाढल्याचे दिसून येताच ही सभा चुटकीसरशी गुंडाळण्यात आली. त्यामुळे बहुसंख्य सभासदांनी संताप व्यक्त केला. या वेळी बँकेचे ज्येष्ठ सभासद, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह सुधाकर परिचारक, राजन पाटील, भाई एस.एम.पाटील, माजी मंत्री आनंदराव देवकते, आमदार दीपक साळुंखे आदी उपस्थित होते.
या सभेत बहुसंख्य सभासदांनी शेती कर्ज वाटप का होत नाही, असा थेट प्रश्न उपस्थित करीत बँकेच्या कारभाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. माळशिरसचे रावसाहेब पराडे यांनी असेच काही प्रश्न लावून धरल्यानंतर सत्ताधारी संचालकांच्या समर्थकांनी हुल्लडबाजी करीत सभासदांची मुस्कटदाबी केली. माढा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर यांनी रब्बी पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याची मागणी करीत माढा तालुक्यातील बँकेच्या दोन शाखांमध्ये झालेल्या अपहाराचा प्रश्न मांडला. संचालकांचे नातेवाईक असल्याने संबंधित दोषी अधिकारी व कर्मचा-यांवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला. संचालकांशी संबंधित सहकारी व खासगी साखर कारखाने तसेच शिक्षण संस्थांकडे कर्जाची थकबाकी असूनही कारवाई का केली जात नाही, असा प्रश्नही उचलून धरला गेला. ठिबक सिंचनासाठी भरीव कर्ज देण्याची मागणी प्रभाकर देखमुख यांनी केली. या गोंधळात बँकेचे अध्यक्ष आमदार दिलीप माने, प्रभारी सरव्यवस्थापक किसन मोटे, बँकेची सूत्रे ताब्यात ठेवणारे माजी अध्यक्ष संजय िशदे यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळे समाधान न झाल्याने गोंधळाला सुरुवात झाली. त्याचवेळी सत्ताधारी समर्थकांनीही हुल्लडबाजी करीत प्रश्न विचारणा-या सभासदांना बळजबरीने खाली बसविण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा बँकेच्या आíथक परिस्थितीचा आढावा अध्यक्ष आमदार दिलीप माने यांनी घेतला. नुकत्याच सरलेल्या २०१२-१३ आíथक वर्षांत बँकेचे भागभांडवल १४८ कोटी १४ लाख, खेळते भांडवल ५१७१ कोटी ६३ लाख, राखीव इतर निधी २९१ कोटी १८ लाख, ठेवी ३४७६ कोटी ४५ लाख, घेतलेली कर्जे १००१ कोटी १८ लाख, दिलेली कर्जे ४०५५ कोटी ३१ लाख, गुंतवणूक ८३३ कोटी ७० लाख, ढोबळ नफा ५८ कोटी ७४ लाख, निव्वळ नफा १८ कोटी, एनपीए १६ टक्के याप्रमाणे बँकेची आíथक स्थिती विशद करण्यात आली. नियम डावलून दिलेली कर्जे व कर्ज थकबाकी वाढल्याने रिझर्व बँकेने या जिल्हा बँकेला दीड कोटींचा दंड ठोठावल्याची माहितीही देण्यात आली. मागील सलग दोन वष्रे दुष्काळ व संकटात सापडलेला साखर उद्योग यामुळे बँकेच्या आíथक परिस्थितीवर परिणाम झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
सोलापूर जिल्हा बँक ‘क’ वर्गात ; गोंधळामुळे वार्षिक सभा गुंडाळली
शतक महोत्सवाकडे वाटचाल करणा-या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या वार्षकि सर्वसाधारण सभेत बँकेची सद्यआíथक स्थिती, अल्पमुदत कर्ज, मध्यम मुदतकर्ज, संचालकांशी संबंधित साखर कारखाने व शिक्षण संस्थांकडे असलेली कर्ज थकबाकी आदी आक्षेपार्ह मुद्दय़ांवर गोंधळ झाला.
First published on: 16-09-2013 at 01:55 IST
TOPICSगोंधळ
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annual meeting wind up due to confusion of solapur jilha bank