गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्रासाठी लाच मागणाऱ्या सहनिबंधक कार्यालयातील क्षेत्र अधिकारी गणेश उरणकर याचे संस्थेच्या सभासदाने स्ट्रिंग ऑपरेशन करीत भिंग फोडल्याने त्याच्यावर सिडकोने अखेर निलंबनाची कारवाई करीत, त्याची विभागीय चौकशी सुरू केली आहे. दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी केलेल्या चौकशीत हा अधिकारी दोषी आढळल्याने कार्मिक विभागाने ही कारवाई केली आहे.  
नवीन पनवेल सेक्टर १० येथील वैष्णवसागर सहकार गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्रावर सहनिबंधकाची स्वाक्षरी होऊनदेखील संस्थेला प्रमाणपत्र देण्यास उरणकर हा टाळाटाळ करीत होता.  या प्रकरणी सोसायटीचे सदस्य अर्णजित चौव्हाण यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि सिडकोच्या दक्षता विभागाकडे  तक्रार केली होती. सोबत उरणकर याने लाचेची मागणी करणारे मोबाइलवरील संभाषणाचे पुरावेदेखील सादर केले होते. या संभाषणाचे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात संभाषणातील आवाज हा उरणकर यांचाच असल्याचे समोर आला.  या प्रकरणी उरणकर यांच्यावर कार्मिक व्यवस्थापक एस.एस. नाईक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या संदर्भात सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा