पिण्याच्या पाण्याच्या शोधात असलेल्या काळविटावर १०-१५ कुत्र्यांनी हल्ला करून त्याच्या पायाचा लचका तोडला. याच वेळी युवक मदतीला धावल्याने काळविटाचे प्राण वाचले. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात हा प्रकार घडला.
तीव्र पाणीटंचाईमुळे हे काळवीट टेंभुर्णी परिसरात कृष्णा खरात यांच्या ‘नेट’जवळील हिरवळ पाहून पाण्याच्या आशेने आले होते. परंतु तेथील दोरामध्ये पाय अडकल्याने त्याची कठीण अवस्था झाली. त्यातच १०-१५ कुत्र्यांनी हल्ला चढवून त्याच्या मागील पायाचा लचका तोडला. आवाज ऐकून आसपासचे युवक धावून आले आणि त्यांनी कुत्र्यांना पळवून लावल्याने काळविटाचे प्राण वाचले. स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केल्यावर या काळविटास जंगलात नेऊन सोडण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा