जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पाश्र्वभूमीवर नशाबंदी मंडळ आणि जळगाव येथील बाहेती महाविद्यालय यांच्या वतीने ‘व्यसनविरोधी युवा निर्माण’ या जिल्हास्तरीय शिबीराचे बाहेती महाविद्यालयात २६ जून रोजी आयोजन करण्यात आले आहे.
शिबीरात पहिल्या सत्रात ‘नशाबंदी मंडळ कार्य व व्याप्ती’ या विषयावर नशाबंदी मंडळाचे प्रदेश चिटणीस चंद्रकांत चौधरी हे मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात मंडळाचे वार्षिक उपक्रम, नियोजन व कार्यकारिणीची नियुक्ती याविषयी जिल्हा संघटक स्वप्नील चौधरी तर, तिसऱ्या सत्रात व्यसनविरोधी कायदे परिचय व अंमलबजावणी, कायद्याची व्याप्ती, अंमलबजावणी होण्यासाठी करावा लागणारा पाठपुरावा याविषयी अ‍ॅड. संतोष सांगळकर मार्गदर्शन करणार आहेत.
चौथ्या सत्रात आरोग्याचा दृिष्टने व्यसनाचे दुष्परिणाम व त्यावर केले जाणारे उपचार या विषयी डॉ. नीलेश चांडक माहिती देणार आहेत. सध्या व्यसन विरोधी कार्य करणाऱ्या आणि भविष्यात या विषयावर कार्य करू इच्छिणाऱ्यांसाठी हे शिबीर उपयुक्त ठरणार आहे. शिबीरात प्रवेश मोफत असून तसेच शिबीरात सक्रियपणे सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे मंडळाचे जिल्हा
संघटक स्वप्नील चौधरी यांनी कळविले आहे.

Story img Loader