अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला त्रास होतो. या पदार्थाचे व्यसन लवकर सुटत नाही. त्यामुळे अमली पदार्थापासून लांबच राहावे, विशेषत: विद्यार्थ्यांनी कोणत्याही अमली पदार्थाचे व्यसन करू नये, असे आवाहन प्रेसिडंट ऑफ ड्रग्स अ‍ॅण्ड अ‍ॅन्युज इन्फॉरमेन सेंटरचे युसूफ मर्चट यांनी केले. जागतिक  अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त वाशी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पोलीस आयुक्त प्रभात रंजन, अप्पर पोलीस आयुक्त विजय चव्हाण, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ शहाजी उमाप, पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा सुरेश मेंगडे आदी उपस्थित होते. या वेळी झालेल्या लव लाइफ हार्ट ड्रग्स या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करून जनजागृती केली.