कर्जत शहर, राशिन व कुळधरण येथील अतिक्रमणांचा विषय तात्काळ थाबंवा, असा आदेश राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रातंधिकारी संदीप कोकडे यांना फोनवर दिला आहे. काँग्रेसचे युवा नेते राजेंद्र देशमुख यांनी त्यांना याबाबत निवेदन दिले होते.  
कर्जत शहरातील मेनरोड, कुळधरण रोड, पंचायत समिती रोड, राशिन येथील देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता व कुळधरण येथील बसस्थानकाचा परिसर या ठिकाणी लहान-मोठे व्यापाऱ्यांची दुकाने व काही नागरिकांची घरेदेखील आहेत. ही घरे व दुकाने काढावीत अशी भूमिका महसूल व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आह़े  काँग्रेसचे राजेंद्र देशमुख यांनी प्रश्नावर संगमनेर येथे जाऊन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. राजेंद्र देशमुख, कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेष जेवरे, प्रकाश सुपेकर व राशिनमधील काही व्यापारी उपस्थित होते.
अतिक्रमणे काढण्याच्या निर्णयाला देशमुख विरोध केला. तसे निवेदन त्यांनी थोरात यांना दिले. कर्जत व राशिनचे नागरिक व व्यापाऱ्यांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली आहेत. त्यामुळे रस्ता पुरेसा मोठा झाला आहे. वहातुकीला तो पुरेसा आहे हे निदर्शनास आणून देत आता ही मोहिम थांबवावी अशी मागणी देशमुख यांनी केली. अन्यथा अनेकांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण होईल असेही त्यांनी मांडले.
थोरात यांनी तातडीने जिल्हाधिकारी व कर्जतचे प्रांत यांना सुचना देऊन ही मोहिम थांबवण्याचा आदेश दिला. यावेळी कोकडे यांनी सध्या मोहिम थांबवली असल्याचेच त्यांना सांगितले. देशमुख यांनी यावेळी जमाखेड तालुक्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी चौंडीच्या तलावात कुकडीचे पाणी सोडण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन थोरात यांनी दिले.    

Story img Loader