मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दिवंगत ज्येष्ठ लेखक -नाटककार जयवंत दळवी यांच्या स्मरणार्थ ‘जयवंत दळवी स्मृती पुरस्कार’ देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार विनोदी लेखनासाठी देण्यात येणार आहे. रोख ११,१११ रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०१० ते ३१ डिसेंबर २०१२ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या विनोदी साहित्याची एक प्रत लेखक/प्रकाशकाने येत्या ५ जुलै पर्यंत पाठवावी, असे आवाहन मॅजेस्टिक प्रकाशनाने केले आहे. हे पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशन, ८ फिनिक्स, तिसरा मजला, ४५७, विठ्ठलभाई पटेल मार्ग, गिरगाव, मुंबई-४००००४ या पत्यावर पाठवायची आहे.
बहुभाषिक कार्यकर्त्यांना आवाहन
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवडक साहित्याचा बारा भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यात येणार असून एका बहुभाषिक संकेतस्थळाचीही निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी गुजराथी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी, आसामी आणि ओरिया भाषांमधील स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी तसेच युवा कार्यकर्त्यांनी मानद सेवेसाठी संपर्क साधावा, असे आवाहन स्मारकाने एका प्रसिद्धी पत्रकात केले आहे. संपर्क दूरध्वनी (०२२-२४४६५८७७/९८२१३७४६२६)
वाचकांसाठी सवलतीत पुस्तके
मॅजेस्टिक बुक हाऊसच्या विलेपार्ले शाखेच्या अकरांव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने येत्या १९ ते २३ जून या कालावधीत पाच पुस्तके २० ते ३० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या पुस्तकांमध्ये मृत्युंजय (शिवाजी सावंत), रुपवेध (श्रीराम लागू), ग्रेट भेट (निखिल वागळे), हरवलेली मुंबई (अरुण पुराणिक) आणि फटकारे (बाळ ठाकरे) यांचा समावेश आहे. प्रथमेश, पहिला मजला, महंत मार्ग, विलेपार्ले (पूर्व) येथील शाखेत रसिक वाचकांना ही पुस्तके सवलतीच्या दरात मिळू शकतील. वाचकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मॅजेस्टिक बुक हाऊसने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा