डोंबिवली येथील स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या शहरातील तरुण-तरुणींना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
यंदा २०१४ ची शिष्यवृत्ती सुगम संगीत विभागासाठी आहे. निवड झालेल्यास दरमहा एक हजार रुपये असे पाच वर्षांसाठी साठ हजार रुपये देण्यात येतील. १८ ते २५ वयोगटातील डोंबिवलीत राहणाऱ्या उमेदवारांसाठीच ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. उमेदवारांनी संगीतविशारद अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गुरूकडून किमान पाच वर्षे शिक्षण घेतल्याचे शिफारसपत्र तसेच सुगम संगीत गायनाची ध्वनिफीत जोडणे आवश्यक आहे. परीक्षक ती ध्वनिफीत ऐकतीलच, शिवाय अंतिम निवडीआधी उमेदवारास प्रत्यक्ष सादरीकरणही करावे लागेल. निवड झालेल्या उमेदवारास वर्षभराच्या रकमेचा धनादेश आणि प्रमाणपत्र दिले जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क-विनायक जोशी-९८२१२३७११३.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा