महिला आर्थिक विकास महामंडळ आणि तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत शासकीय अधिकाऱ्यांकरिता येथे आयोजित समूह कृतीसंगम या कार्यशाळेत बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी व्यक्तिमत्त्व व कौशल्य विकसित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
व्यासपीठावर महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी अरविंद गोरे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी बी. एच. नागरगोजे, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी महिलांना जर उत्पन्नाचे साधन असेल तरच त्यांचा विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत खंत व्यक्त करून लांडगे यांनी त्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. अज्ञानामुळे मुलांचे कुपोषण होते. ग्रामीण भागात घरोघरी शौचालयांची बांधणी केल्यास महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यशाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, कृषी उपसंचालक प्र. ए. वानखेडकर, वसुंधरा पाणलोटचे उपप्रकल्प व्यवस्थापक डी. यू. बोरसे, उन्नती साधन केंद्राच्या ललिता पवार, मोहन गोस्वामी, प्र. दा. जगताप, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक विलास कर्डक यांनी महिलांच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले.
महिलांना व्यक्तिमत्त्व विकसित करण्याचे आवाहन
महिला आर्थिक विकास महामंडळ आणि तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत शासकीय अधिकाऱ्यांकरिता येथे आयोजित समूह कृतीसंगम या
आणखी वाचा
First published on: 11-02-2014 at 07:37 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appeal to women to develop the personality