स्टार बसवरील जाहिराती संदर्भात महापालिका प्रशासनाकडे ‘शिवम अ‍ॅडव्हरटायझिंग’ या कंपनीने अधिक मोबदल्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रतिबस वर्षांला १२ हजार रुपये देण्याची तयारी या कंपनीने दर्शविली असून या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेने स्टारबस नावाने प्रवासी वाहतूक सुरू केली या सेवेचे स्टेअरिंग सध्या खाजगी ऑपरेटकडे देण्यात आले आहे. महापालिका व ऑपरेटर दरम्यान झालेल्या करारानुसार स्टारबसेसवर जाहिरातीच्या माध्यमातून मिळणारा मोबदला दोघांनाही विभागून मिळणार आहे. ऑपरेटरने यापूर्वीच त्यांच्या २३० बसेस जाहिरातीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसेसवर जाहिराती लावण्याचे अधिकार ‘ब्ल्यू ओशीयन’ या कंपनीला दिले होते. जेएनएनयूआरएमतंर्गत मिळालेल्या बसेस अद्याप जाहिरातीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे एनएमपीएलने या बसेससाठी ईओआय (इंटरेस्ट ऑफ एक्सप्रेशन) मागविले आहे. ऑपरेटरच्या बसेसचा जाहिरातीसाठी उपयोग करणाऱ्या ‘ब्ल्यू ओशीयन’ कंपनीने या बसेसवर जाहिराती संदर्भात इच्छा प्रदर्शित केली आहे मात्र त्यांचा एनएमपीएलने तुर्तास विचार केला नाही. ऑपरेटला दिला जाणाऱ्या मोबदला एवढाच म्हणजे २४० बसेसमागे दरमहा ७५ हजार रुपये देण्याची तयारी दाखविली आहे. मोबदला वाढवून मिळावा यासाठी एनएमपीएलचे कार्यकारी संचालक व महापालिकेचे अपर आयुक्त हेमंत पवार गेल्या काही दिवसात नवीन कंपनीच्या शोधात होते. शिवम अ‍ॅडव्हारटायझिंगने महापालिका प्रशासनाकडे ‘ईओआय’ सादर केला. त्यांनी वार्षिक प्रतिबस १२ हजार रुपयाचा मोबदला देण्याची तयारी दशविली आहे. या प्रस्तावानुसार महापालिकेकडे जेएनएनयूआरएमच्या २४० बसेसमागे महापालिकेला दरमहा २ लाख ४० हजार रुपयाचा मोबदला मिळणार आहे.
या प्रस्तासंदर्भात ‘शिवम अ‍ॅडव्हारटायझिंग’ च्या अधिकाऱ्यांनी हेमंत पवार यांच्याशी चर्चा केली असून त्यांना सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात सांगितले आहे. आतापर्यंत बसेसवर फ्लॅक्सच्या जाहिराती चिकटविण्यात येत होत्या. परंतु त्या वारंवार खराब होतात. त्यामुळे बसेस रंगविण्याची मागणी शिवम कंपनीने केली आहे. हा धोरणात्मक निर्णय असल्याने एनएमपीएलच्या बैठकीत संचालकांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे हेमंत पवार यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Application of advertisment on star bus