हैदराबाद येथे गेल्या १८ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ११ उमेदवारांपैकी १० उमेदवारांना शासनाच्या आदेशान्वये वनक्षेत्रपाल गट-ब  पदावर वनक्षेत्रपाल म्हणून नियुक्तया देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र वनसेवा परीक्षा २००८च्या अंतिम निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वनक्षेत्रपाल गट-ब संवर्गातील नियुक्तीसाठी ११ उमेदवारांची हैद्राबादच्या वन प्रशिक्षण अकादमीकडे शिफारस केली होती. त्यांच्यापैकी १० उमेदवारांना गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, धुळे आणि पुण्यातील वनसेवेबरोबरच पुण्याच्या सामाजिक वनीकरण विभागात नियुक्त करण्यात आले आहे. योगिता सोनवणे, इंद्रजित निकम, राहुल मराठे, शेखर तनपुरे, राधिका फलफले, ज्योती पवार, रोशन राठोड, यशवंत नागुलवार, संदीप गिरी आणि दीपक पवार या दहा जणांना परिविक्षाधिन वनक्षेत्रपाल म्हणून नियुक्ती मिळाली आहे.
राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत यांनी वनभवनात या नवनियुक्त उमेदवारांचा स्वागत कार्यक्रम आयोजित केला. यावेळी मुख्य वनसंरक्षक(मनुष्यबळ वि कास व्यवस्थापन) शैलेश टेंभुर्णीकर उपस्थित होते. भगत यांनी पुढील कारकीर्दीसाठी परिविक्षाधिन वनक्षेत्रपालांना शुभेच्छा दिल्या. शेखर तनपुरे यांनी आभार मानले, यशवंत नागुलवार यांनी आभार मानले.

Story img Loader