‘कॅपेचिनो’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट संगीतातील वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांमध्ये आता ‘अरेबिक’ बाज असलेल्या एका नव्या गाण्याची भर पडणार आहे. संगीतकार अविनाश-विश्वजित यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे.
एस.डी. मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या चित्रपटातील ‘अलिफिया, अलिफिया’ हे गाणे अरेबिक बाजात बांधण्यात आले असून मानसी नाईक आणि संजय नार्वेकर यांच्यावर ते चित्रीत करण्यात आले आहे.
हे गाणे विश्वजित जोशी, शिव कदम यांनी लिहिले असून शिखा अजमेरा या तरुण गायिकेने ते गायले आहे.
‘कॅपेचिनो’ चित्रपटातील गाण्यांच्या ध्वनिफितीचे प्रकाशन नुकतेच एका कार्यक्रमात झाले. त्यावेळी शिखाने हे गाणे सादर केले.
अलीकडे प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातील गाण्यांच्या संगीतात या गाण्याच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच अरेबिक बाजाचा वापर केला असल्याचा दावा अविनाश-विश्वजित यांनी केला. ‘अलिफिया, अलिफिया’ हे हिंदूी गाणे संपूर्णपणे असून त्याचे शब्द ‘रात ये शराबी, ये हवा गुलाबी, कैसी है तनबदन में अगन..’ असे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा