चालू मोसमात डेंग्यूने आजारी पडणाऱ्यांची संख्या ३०० हून अधिक झाली असूनही घरातील डेंग्यू डासांचे उत्पत्तीस्थान नष्ट करण्याबाबत मुंबईकर मात्र उदासीन असल्याचे दिसत आहेत. कुंडी, फुलदाणी, घरावर टाकलेले प्लास्टिक, भंगारातील सामान यात आतापर्यंत दीड हजारहून अधिक ठिकाणी डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. आपल्या घरातच डासांची पदास होऊ शकते, हा धक्का रहिवाशांना पचवावा लागला आहे.
वरळी, कोळीवाडा येथील १४ वर्षांच्या मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर बुधवारी या वस्तीत किटकनाशक अधिकारी पोहोचले. एकावर एक उभ्या राहिलेल्या खोल्यांवरील पावसाचे पाणी जाण्यासाठी केलेल्या टनेलमध्ये साचलेल्या पाण्यातही डेंग्यूचे डास आढळले. घराबाहेर ठेवलेली पाण्याची िपपे, छपरावर टाकलेले प्लास्टिक उडू नये, म्हणून त्यावर ठेवलेले टायर यामधील पाण्यात डास आढळून आले. या वस्तीत चार ठिकाणी डेंग्यू डासांच्या अळ्या नष्ट करण्यात आल्या, अशी माहिती किटकनाशक अधिकारी आर. नािरग्रेकर यांनी दिली. बोरीवली येथील देवीपाडा वस्तीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विकासकाने अध्र्याहून अधिक घरांवरील पत्रे काढून टाकले आहेत. त्या घरात पाणी साचून डेंग्यूंची उत्पत्ती होत आहे. त्यातच या योजनेला विरोध असलेले काही रहिवासी तेथे राहत असून िभतीवरून पाणी घरात येऊ नये यासाठी त्यांनी प्लास्टिकचे कापड लावले होते. लांब असल्याने जमिनीजवळ दुमडलेल्या या कापडात डेंग्यूच्या अळ्या आढळून आले.डेंग्यू डासांची उत्पत्तीस्थाने इमारतींच्या टेरेसवर, जलवाहिनींमध्ये अडकलेल्या पाण्यात, कुंडीखालील प्लेट, फुलदाणी, फेंगशुईची रोपे यात असल्याचे आढळल्यावर जूनपासून डेंग्यू डासांच्या अळ्या शोधण्याची मोहीम अधिक विस्तृत करण्यात आली. त्यात आतापर्यंत लाखो जागांवर पोहोचून दीड हजाराहून अधिक ठिकाणच्या डेंग्यू डासांच्या अळ्या नष्ट केल्याची माहिती किटकनाशक अधिकारयांनी दिली. पालिकेचे अधिकारी असल्याने रहिवासी घरात, इमारतीत येण्याची लगेच परवानगी देतात, मात्र अजूनही ९० टक्के लोक मलेरिया आणि डेंग्यू डासांच्या उत्पत्तीबाबत उदासीन आहेत, असा अनुभव पालिका कर्मचारयांना येत आहे.
डेंग्यूचे पालिका रुग्णालयातील रुग्ण
जून – ३२
जुल – ६०
ऑगस्ट – ६
अधिकृत माहितीनुसार डेंग्यूचे रुग्ण व मृत्यू
२०१३ – ३१९ – एक मृत्यू
२०१२ – १००८ – पाच मृत्यू
२०११ – ४१६ – तीन मृत्यू
२०१० – ११५ – तीन मृत्यू