भारतीय लष्करातील नोकरी म्हणजे देशसेवा आहेच, शिवाय जगणे सुंदर करण्याचा एक अनोखा मार्गही आहे, त्यामुळे युवकांनी सैन्यदलाकडे आपल्या साहसी वृत्तीला संधी देणारी संस्था म्हणुन पहावे व सैन्यदलात भरती व्हावे असे आवाहन लष्कराच्या आर्मड कोअर सेंटरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोककुमार मेहता यांनी केले.
नगर महाविद्यालयातील एनसीसी छात्र पुष्पेंद्रसिंग याने दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचलनात ऑल इंडिया बेस्ट कॅडेटचे सुवर्णपदक मिळवल्याबद्धल त्याचा तसेच संचलनातील सहभागाबद्धल छात्र तुषार बगे, स्वप्नील बोठे यांचा मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस, यावेळी उपस्थित होते. मेहता यांनी सांगितले की सैन्यदलात असलेली माझ्या घराण्याची माझी पाचवी पिढी आहे. देशातील अनेक घराण्यांमध्ये ही परंपरा आहे. यात मिळणारा मान,सन्मान लोकांचा आदर या महत्वाच्या गोष्टी आहेत व अन्य कोणत्याही सेवेत त्या मिळत नाहीत. प्राचार्य डॉ. बार्नबस यांनी महाविद्यालयातील एनसीसी परंपरेचा महाविद्यालयाला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. पुष्पेंद्रसिंग याने ऑल इंडिया सुवर्णपदक मिळवून महाविद्यालयाच्या परंपरेलाच सुवर्णपदक मिळवून दिले आहे असे ते म्हणाले. महाविद्यालयातील एनसीसी छात्रांनी पाहुण्यांना सलामी दिली. प्रा. नोएल पारगे यांनी मेहता यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला उपप्राचार्य एन. एस. गायकवाड, जी. एल. उंडे, एम. बी. अय्यर आदी उपस्थित होते. डॉ. कमलाकर भट यांनी सुत्रसंचालन केले. मेजर डॉ. शाम खरात यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा