बदली होऊ नये यासाठी अपंग असल्याची बोगस प्रमाणपत्र सादर करणाऱ्या आणखी ७ शिक्षकांना कोतवाली पोलिसांनी आज अटक केली. हे सर्वजण स्वत: होऊन पोलीस ठाण्यात हजर झाले होते.
रावसाहेब यादव औटी (वय,४९ रा. पारनेर), सुरेश विठ्ठल ननवरे (वय,३२ रा. कान्हूर पठार), रामदास शिंदे (वय,४० रा. टाकळी), संजय पोपट घोडके (वय,४० रा.श्रीगोंदे), तानाजी किसन गोडे (वय, ४०. रा. अकोले), हेमंत श्रावण बारहाते (वय,४२), शेख अब्दूल हमीद गफार (वय,३५, रा. खातगाव टाकळी) अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावे आहेत.
बोगस प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाल्यापासून गेले दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ गायब होते. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. असे एकूण ७६ शिक्षक सापडले आहेत. न्यायालयातून जामीन मिळण्याचे सर्व प्रयत्न थकल्यानंतर त्यांच्यापैकी बहुतेकजण आता पोलीस ठाण्यात हजर होऊ लागले आहेत. आणखी ४ ते ५ शिक्षक गायब आहेत. तेही आता हजर होतील असे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा