येथील रामकृष्णनगरात कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून महिलेसह दोघांना अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून या कुंटणखाना प्रकाराची शहरात चर्चा होत होती.
रामकृष्णनगरात योगेश पंडित साबळे याच्या घरी पोलिसांनी साबळेसह राजकुमार रामदास गायकवाड याला अटक केली. स्वत:च्या राहत्या घरी आरोपींनी वेश्या व्यवसायास जागा देऊन कुंटणखाना चालविल्याचे या वेळी उघडकीस आले. पोलिसांनी एका महिलेलाही अटक केली. नवा मोंढा पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध अनतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियमानुसार कारवाई करून अटक करण्यात आली.
अरेरावी करणाऱ्या फौजदाराची बदली
बुधवारी रात्री रामकृष्ण नगरमधील साबळे यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकून तीन मुली व इतर दोघांना ताब्यात घेतले. या घटनेचे वृत्तसंकलन करीत असताना वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी विशाल माने व शेख सलीम यांना छायाचित्रण करण्यास फौजदार वांद्रे यांनी मज्जाव केला. तसेच अरेरावीची भाषा वापरून माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पत्रकारांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पोलीस अधीक्षक पाटील यांची भेट घेतली. वांद्रे यांच्याविषयी तक्रार करताच पाटील यांनी त्यांची तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश दिले. तसेच जिल्ह्यात कुठल्याही गुन्ह्याची अथवा घटनेची माहिती देण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची सूचना दिली. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांचीही पत्रकारांनी भेट घेतली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा