जिल्हा परिषदेच्या बनावट अपंग प्राथमिक शिक्षकांचे अटकसत्र अद्यापि सुरुच आहे. फसवणूक करणाऱ्या तीन शिक्षकांना आज अटक करण्यात आली. कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्य़ातील आरोपींची एकूण संख्या आता ९२ झाली आहे, त्यातील ८७ जणांना अटक करण्यात आली आहे. अद्यापि तपास सुरुच असल्याने, काही शिक्षकांना अटक झालेली नसल्याने व बनावट प्रमाणपत्र उपलब्ध करणाऱ्यांची नावे निष्पन्न व्हायची असल्याने आरोपींची एकुण संख्या लवकरच शंभरी ओलांडेल.
दत्तात्रेय लक्ष्मण पटारे (कारेगाव, श्रीगोंदे), सुर्यभान मोहन वडतके (गळनिंब) व शेख महमद मनेसाब (दोघेही श्रीरामपूर) या तिघांना आज अटक करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिघांनाही दोन दिवसांच्या (दि. ६ पर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या तिघांनीही संजय कांबळे या एजंटाकडून अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्रे घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
आणखी तीन शिक्षकांना अटक
जिल्हा परिषदेच्या बनावट अपंग प्राथमिक शिक्षकांचे अटकसत्र अद्यापि सुरुच आहे. फसवणूक करणाऱ्या तीन शिक्षकांना आज अटक करण्यात आली. कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्य़ातील आरोपींची एकूण संख्या आता ९२ झाली आहे, त्यातील ८७ जणांना अटक करण्यात आली आहे.
First published on: 05-03-2013 at 03:10 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest to more three teacher