हुंडय़ासाठी पती, सासरा व सासूने रॉकेल ओतून जिवंत जाळणाऱ्या आरोपींना सालेकसा पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर  गुन्हा नोंद केला आहे. ममता शिवप्रसाद कावळे या विवाहितेवर माहेरून पसे आण म्हणून तगादा लावणारे पती, सासू व सासरा यांनी १३ जुलच्या सकाळी ७ वाजताच्या दरम्यान अंगावर रॉकेल ओतून तिला आगीत झोकून दिले. त्यात ती ८५ टक्केजळाली होती. दरम्यान, गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला होता. याप्ररकणी सालेकसा पोलिसांनी चौकशीसाठी या तिघांनाही काल ताब्यात घेतले होते. दरम्यान, हुंडय़ासाठीच ममताला जाळण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रणदिवे करीत आहेत.