लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी यंत्रमाग कामगाराला बुधवारी इचलकरंजीत अटक करण्यात आली. प्रवीण सतीश जाधव (वय २३ रा.विक्रमनगर, इचलकरंजी) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
प्रवीण जाधव याच्या शेजारीच पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी राहत होती. ती २९ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार गावभाग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती. त्याआधारे पोलीस तपास करीत होते. प्रवीणकडे असलेल्या मोबाईलचा पोलिसांनी मोबाईल कॉल डिरेक्टरीच्या आधारे शोध घेतला असता तो सांगोला येथे अल्पवयीन मुलीसमवेत पोलिसांच्या हाती सापडला. त्याने मुलीला विवाहाचे आमिष दाखवून पुणे जिल्ह्य़ातील वडगाव येथे बलात्कार केला होता. तशी फिर्याद मुलीच्या भावाने गावभाग पोलीसांमध्ये दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा