अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स तसेच शालेय पोषण आहार कामगार व ग्राम रोजगार सेवक यांचा प्रचंड महापडाव दिल्लीत होणार आहे. २६ व २७ नोव्हेंबर असे दोन दिवस हा महापडाव रामलीला मैदानावर होणार आहे. या महापडावात जिल्हयातील सर्व योजना कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सी.आय.टी. यू.चे जिल्हा सेक्रेटरी कॉ. पंजाबराव गायकवाड यांनी केले आहे.
कुपोषण मुक्तीच्या कार्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे देशाने मोठी मजल गाठली आहे. याशिवाय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या आशा वर्कर्सनी देखील लक्षणीय कामे केलेली आहेत. मात्र असे असूनही ग्रामीण भागात काम करणाऱ्या या घटकावर सरकार अन्याय करत आहे. सध्याचे केंद्रातील सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योग्य ते मानधन देण्यासाठी पैसा नसल्याचे कारण दिले जात आहे. शासनाला विरोध करण्यासाठी देशभरातील लाखो योजना कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या महापाडावात सहभागी होण्यासाठी जिल्हयातील अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स, शालेय पोषण आहार कामगार व ग्रामसेवकांनी शनिवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री मलकापूर स्टेशनवर हजर रहावे, असे आवाहन पंजाबराव गायकवाड, कॉ. सुधीर देशमुख, अशोक लांडगे, दुर्गा चव्हाण, सविता चोपडे, पुंजाबाई चोपडे, स्वाती वायाळ, सरला मिश्रा, संतोषी नागरे, जयश्री क्षीरसागर, अलका कुळकर्णी, शालिनी सरकटे, शुभांगी गवळी, प्रमिला लोखंडे, राधिका भुसारी, शीला ठाकरे, राजश्री नेमाडे, वर्षां शेळके यांनी केले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा