आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी विठ्ठलभक्तीपर संगीत वेगवेगळ्या पद्धतीने सादर करणाऱ्या योजना प्रतिष्ठानचा यंदाचा २४ वा कार्यक्रम आषाढी एकादशीला म्हणजेच १९ जुलै रोजीच दुपारी ३.३० वाजता शिवाजी मंदिर येथे सादर होणार आहे.
गेल्या वर्षी बासरीवादनाचे गुरूकुल पद्धतीने शिक्षण देणारे विवेक सोनार यांच्या शिष्यांना घेऊन योजना शिवानंद यांनी विठ्ठलभक्तीचा कार्यक्रम सादर केला होता. यंदा योजना शिवानंद ‘विठ्ठलानंद’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
ठाण्यात संगीताचे शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थिनींसोबत संगीतातील ज्येष्ठ गुरू पं. तुळशीदास बोरकर, बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी आणि स्वत: योजना शिवानंद सहभागी होणार आहेत. ‘माझे माहेर पंढरी’, ‘भेटीलागे जीवा’ यांसारखी असंख्य गाणी मराठी रसिकांच्या ओठांवर रूळलेली आहेत. म्हणूनच यंदा ‘नि:शब्द भक्ती’ ही संकल्पना ठरविण्यात आली आहे.
सानिका देवधर, स्नेहा काणे, गायत्री गुर्जर, हर्षदा कुलकर्णी, स्मिता वेलणकर, सुवर्णा दीक्षित, जयश्री खासनीस या संगीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी योजना शिवानंद यांना साथ करणार आहेत. पं. शिवानंद पाटील यांची रचना रूपक कुलकर्णी सादर करणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा